
व्यापाऱ्याकडील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार प्रकरणी मालाड पोलिसांनी विक्रमसिंग राव या आरोपीला अटक केली. तक्रारदार हे सोने व्यापारी आहेत. गेल्या वर्षी त्याची ओळख विजयसिंह याच्याशी झाली. त्याने त्याचे काळबादेवी येथे सोन्याचे दुकान असल्याचे भासवले. त्याच्याशी व्यवहार करण्याची इच्छा व्यक्त केली. सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात त्यांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून त्याने गेल्या वर्षी 3 कोटी 68 लाखाचे सोने दिले. ठरल्यानुसार त्याने तक्रारदार याना सोन्याचे बिस्कीट दिले नव्हते. याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीवरून विक्रमसिंहला ताब्यात घेतले.



























































