करता करता दमला, सेक्स करताना अवसान गळाल्याने तरुणाचा मृत्यू

कॉलगर्लसोबत सेक्स करताना अतिउत्तेजित झाल्याने अवसान गळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मलावी देशात घडली आहे. चार्लस माजावा असे त्या तरुणाचे नाव असून तो मालावीच्या फालौम्बे जिल्ह्यातील रहिवाशी होता.

35 वर्षीय चार्लस एका कॉलगर्लला घेऊन हॉटेलमधील रुमवर गेला होता. तिथे त्या दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. सेक्स करत असताना तो तरुण शरीर सुखाच्या परमोच्च आनंदाच्या क्षणापर्यंत पोहोचला. मात्र ऑरगॅझम होताच तो बेशुद्ध पडला. त्याला काय झाले ते त्या कॉलगर्लला समजलेच नाही. तिने हॉटेल स्टाफला याबाबत कळवले. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांना त्या कॉलगर्लवर संशय व्यक्त केला होता. मात्र नंतर शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिची निर्दोष सुटका करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या