शहीद जवान संजय सिंहाच्या अस्थींचे विसर्जन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मलकापूर

जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथील अवतीपुरा भागात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले त्यापैकी संजयसिंह राजपुत व नितीन राठोड हे दोघे जवान बुलढाणा जिल्ह्यातील होते.

शनिवारी शोकाकूल वातावरणात मलकापूर येथील मातामहाकाली नगरातील लख्खानी प्लॉट जवळील नगरपालिकेच्या खुल्या प्रांगणात शहीद जवान संजयसिंहावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्यांचा रक्षा विसर्जन व अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम परिवार, आप्तेष्ट नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शहीद जवान संजयसिंह यांचे दोन्ही मुले जयेश व शुभम, भाऊ राजेशसिंह, संजोगसिंह, पुतण्या यश राजपुत, पियुष राजपुत, कैलाससिंह राजपूत, सोहनसिंह बिसेन, नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, नगरसेवक राजेंद्र वाडेकर, सुहास चवरे, अनिल बगाडे, अनिल गांधी, राजू ईंगळे, पत्रकार गजानन ठोसर, विरसिंह राजपुत, हरीभाऊ गोसावी सह नागरिकांची उपस्थिती होती. त्यानंतर संजयसिंहाच्या अस्थी श्री क्षेत्र धुपेश्वर येथील पूर्णामायेत विसर्जित करण्यात आल्या.