माळशेज घाटाजवळ रस्ता खचला, कल्याण-नगर वाहतूक बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
malshej-ghat

सामना ऑनलाईन । कल्याण

कल्याण-नगर रस्त्यावरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. माळशेज घाट चढल्यावर येणाऱ्या करमाळे गाव येथे रस्ता खचला यामुळे कल्याण-नगर रस्ते वाहतूक अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात आली आहे, अशी माहिती जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिसांनी दिली.