मालवण किनारपट्टीवर सडलेल्या अवस्थेत आढळली मृत व्हेल

391

मालवण तालुक्यातील तळाशील किनारपट्टीवर रविवारी सायंकाळी मृत व्हेल मासा सडलेल्या अवस्थेत दिसून आला. दरम्यान, सरपंच आबा कांदळगावकर यांनी वन विभागाला माहिती दिली असून सोमवारी सकाळी मृत व्हेलची योग्यरीत्या विल्हेवाट लावली जाणार आहे. गत वर्षी याच किनाऱ्यावर मोठा व्हेल मासा मृत अवस्थेत सापडला होता. यावर्षी पुन्हा एकदा 25 ते 30 फूट लांबीचा व्हेल सडलेल्या अवस्थेत सापडला.

आपली प्रतिक्रिया द्या