दर्जेदार कामाचा आदर्श कायम ठेवा – राजेंद्र पराडकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

पंचायत समितीतील बदली झालेल्या कर्मचार्‍यांनी आपल्या कारकिर्दीत दर्जेदार कामकाज केले आहे. असेच आदर्श काम करून त्यांनी भविष्यातही प्रगती साधावी, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी येथे केले.

मालवण पंचायत समितीतून बदली झालेल्या कर्मचार्‍यांचा निरोप समारंभ काल छत्रपती संभाजीराजे सभागृहात झाला. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी संजय गोसावी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. सभापतींचे स्वीय सहायक नंदू मांजरेकर यांची देवगड पंचायत समिती, आर. के. चव्हाण यांची लघुपाटबंधारे विभाग कुडाळ, योगेश गावडे यांची सिंधुदुर्गनगरी, भिमसेन पळसंबकर यांची ग्रामपंचायत विभाग सिंधुदुर्गनगरी, आराधना धुपकर यांची कुडाळ पंचायत समिती, ग्रामसेवक राजेंद्र गुरव यांची शिरवल-कणकवली, व्ही. डी. पवार यांची आसोली-वेंगुर्ले येथे बदली झाली. यानिमित्त पंचायत समितीच्यावतीने या सर्व कर्मचार्‍यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बदली झालेल्या कर्मचार्‍यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन करून श्री. मांजरेकर यांनी आभार मानले.