लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप, प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नाचं वचन देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक झाली आहे. या दिग्दर्शकाला त्याच्या चित्रीकरण स्थळावरूनच अटक करण्यात आली आहे.

या चित्रपट दिग्दर्शकाचं नाव लीजू कृष्णा असं आहे. लीजूने पडावेट्टू नावाचा मल्याळम चित्रपट दिग्दर्शित केला आहे. लीजूविरुद्ध काकानाड येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

 

या तक्रारीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून लीजूची या महिलेसोबत ओळख झाली होती. लीजू आणि पीडित महिला एकत्र राहत होते. लीजूने लग्नाचं आश्वासन देऊन महिलेसोबत डिसेंबर 2020 ते जून 2021मध्ये बलात्कार केला. जेव्हा पीडितेने लग्नाची विचारणा केली तेव्हा लीजूने हे आश्वासन दिल्याचं नाकारलं, असा आरोप महिलेने केला आहे.

त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर लीजूला अटक झाली आहे. लीजू या दरम्यान चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. चित्रपटातील त्याची कारकिर्द फारशी सुरू झालेली नाही आणि त्याच्या विरोधात गंभीर आरोप झाले आहेत. सध्या लीजूला अटक झाल्यामुळे चित्रपटाचं चित्रीकरण थांबलं आहे.