मनरेगामधून बापूंचे नाव काढून टाकणे हे लज्जास्पद, ममता बॅनर्जी यांची मोदी सरकारवर टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजनेतून (मनरेगा) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव काढून टाकणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांनी घोषणा केली की, राज्याच्या ‘कर्मश्री’ रोजगार गारंटी योजनेचे नाव बदलून ते महात्मा गांधी यांच्या नावाने ठेवले जाईल.

कोलकात्यात एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मनरेगा योजनेतून बापूंचे नाव हटवणे हे देशाच्या इतिहास आणि महात्मा गांधी यांचा अपमान आहे. मला हे खूप लज्जास्पद वाटतं, कारण मीही या देशाची नागरिक आहे. जर केंद्र सरकार राष्ट्रपित्याला आदर देऊ शकत नाही, तर आम्ही देऊ. आम्ही आमच्या राज्याच्या कर्मश्री योजनेचे नाव महात्मा गांधी यांच्या नावावर ठेवू.”