
सामना ऑनलाईन । पश्चिम बंगाल
ममता बॅनर्जी आपल्याला वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठकतात, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पाठवत असलेल्या भेटीचा राजकीय वापर केल्याने ममतादीदी चांगल्याच भडकल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका सभेत बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी मोदींना आता मातीचे लाडू पाठवणार असा संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता अक्षयकुमारला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाठवत असलेल्या भेटीचा उल्लेख केला होता. यामुळे संतापलेला ममता बॅनर्जी यांनी आता आम्ही मोदींना असा रसगुल्ला खाऊ घालणार की खाताना त्यांचे दात तुटतील. मोदींना जी मिठाई दिली जाईल ती मातीने बनकिलेली आणि त्यात दगड आणि कीटा असतील, असे त्या म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपला 2014 मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. याकेळी त्यांना मोठा रसगुल्ला म्हणजे भोपळा मिळेल असेही त्या म्हणाल्या.

























































