
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही काळापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर ममता यांचे भाऊ स्वपन बॅनर्जी हे भाजपमध्ये सामील होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्वपन बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसवर नाराज असून भाजपमध्ये सहभागी होतील, अशा चर्चा होत होत्या. स्वपन बॅनर्जी यांना हावडा येथील लोकसभेची उमेदवारी मिळणे अपेक्षित होते, पण त्या जागी प्रसून बॅनर्जी यांची निवड झाल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, अशा चर्चा सुरू झाल्या.
यावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वपन याच्याशी आपला काहीही संबंध नाही, तो त्याला हवं ते करू शकतो. मला माझ्या कुटुंबाचं नाव त्याच्याशी जोडलं गेलेलं आवडणार नाही, असं ममता यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, स्वपन बॅनर्जी यांनी भाजपमध्ये सहभागी होत नसल्याचं स्पष्ट करत आपण ममता बॅनर्जी यांनाच पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे.

























































