
आर्टिफिशल इंटिलिजन्स (एआय) चा वापर करून अभिनेत्रींचे एडिट आणि मॉर्फ केलेले अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱयाला अखेर बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. अनशुल उपेंद्र सचान असे त्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत किती जणांचे मॉर्फ व्हिडीओ व्हायरल केले याचा तपास पोलीस करत आहेत.
तक्रारदार या अभिनेत्री आहेत. गेल्या वर्षी त्याने एका अॅपवर आपले व्हिडीओ अपलोड केले होते. ते व्हिडीओ पाहण्यासाठी ग्राहकांना पैसे लागतात. डिसेंबर महिन्यात त्या घरी असताना त्यांना सोशल मीडियावर मेसेज आला. खासगी पह्टो व्हायरल झाल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला. त्यानंतर अभिनेत्रीला धमकीचे मेसेज येऊ लागले. जानेवारी महिन्यात टेलिग्राम अॅपवर त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती त्यांना समजली. एका अॅपवरचे मूळ व्हिडीओ चोरी करून एआयच्या मदतीने मॉर्फ अश्लील व्हिडीओ व्हायरलप्रकरणी अभिनेत्रीने बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
सहाय्यक आयुक्त रेणुका बागडे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे, भदरगे, गोवलकर, तावडे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. एआयच्या माध्यमातून ते व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. ते व्हिडीओ व्हायरल करणाऱयाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशच्या गाझियाबादला गेले. त्यानंतर पोलिसांनी अनशुलची चौकशी केली. कसून चौकशी केल्यावर त्याने ते व्हिडीओ व्हायरल केल्याची कबुली दिली. अनशुल हा उत्तर प्रदेश येथे वकील म्हणून काम करतो. पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल जप्त केला आहे. अनशुल हा अभिनेत्रीचा इंटरनेटवर पाठलाग करत असायचा. तो टेलिग्रामवरील दोन संपका&त असून त्याने तेथे अभिनेत्रींचे व्हिडीओ पुरवले होते. मॉर्फ व्हिडीओ खरे असल्याचे भासवले होते. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.



























































