चिमुरडीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

426
प्रातिनिधिक

उरण शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुभम जीतलाल विश्वकर्मा (25) असे या आरोपीचे नाव आहे.

उरण शहरातील एक साडेचार वर्षीय मुलीशी अश्लिल चाळे केले. पालकांना याबाबत मुलीने सांगितल्यानंतर पालकांनी शुभम विश्वकर्मा याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ताबडतोब आरोपी विरोधात बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणी उरण पोलिस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या