धक्कादायक! विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीच्या गुप्तांगात भरली मिरची पावडर

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एका पतीने त्याच्या पत्नीच्या गुप्तांगात मिरची पावडर भरल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील मुझफ्फरपूर येथे घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या क्रूर पतीला अटक केली आहे.

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील पारू परिसरात हे दाम्पत्य राहत होतं. पतीला त्याच्या पत्नीचे एका पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याने त्याबाबत दोन दिवसांपूर्वी पत्नीला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला व त्यानंतर त्याने पत्नीला बांधून ठेवून तिच्या गुप्तांगात मिरची पावडर भरली. तसेच गरम इस्त्रीने त्याने तिच्या मांड्यांना चटके दिले. त्यानंतर दोन दिवस त्याने तिला अन्न पाणी काहीही न देता एका खोलीत कोंडून ठेवले.

दरम्यान दोन दिवसांनी त्या महिलेचा भाऊ त्यांच्या घरी आल्यानंतर त्याला हा सर्व प्रकार समजला. त्याने् बहिणीची तेथून सुटका करून पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. तसेच महिलेची सासू, मेहुणा आणि मेहुणी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.