बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत अंडे फोडणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझगाव येथील बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवेळी अंडे फोडून पसार झालेला व्यक्ती अखेर सापडला आहे. दानिश शेरखान (२२) असे त्याचे नाव आहे. मिरवणुकीवेळी फोडलेल्या फटाक्यांचा धूर डोळ्यात जाऊन त्रास झाल्यामुळे त्या रागातून अंडे फोडण्याचे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे. रविवारी रात्री ‘माझगावचा मोरया’ गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा आगमन सोहळा होता. त्या वेळी बाप्पाच्या मंडपापासून काही अंतरावर अंडे फोडण्याचा प्रकार घडल्याने तणाव निर्माण झाला होता.