
खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराकडून सिंहगड पोलीसांनी एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. प्रथमेश मोहन उर्फ शंकर नामदेव सरवदे (वय 20, रा. भिलारवाडी, कात्रज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सिंहगड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना नऱ्हेतील भुमकर चौकात सराईत गुन्हेगार प्रथमेश सरवदे पिस्तूल बाळगून उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळून आली. प्रथमेश आणखी कोणता गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता का, याची माहिती पोलिस घेत आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, शंकर कुंभार,उज्ज्वल मोकाशी, किशोर शिंदे, दयानंद तेलंगे पाटील, पुरूषोत्तम गुन्ला, अविनाश कोंडे, राहूल शेंडगे, धनाजी धोत्रे, मोहन भुरूक, राजेश गोसावी यांच्या पथकाने केली.
























































