विमानात झाली ओळख, मैत्रीच्या बहाण्याने केला बलात्कार

rape
प्रातिनिधिक फोटो

गोवा पोलिसांनी एका महिलेसोबत बलात्काराच्या आरोपाखाली गुजरातच्या लक्ष्मण शियारला अटक केली आहे. आरोपीला गोवा म्हापसा शहरातील थिविम गावातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी 23 ऑगस्टला घडली आणि पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 47 वर्षीय आरोपीला अटक केली. लक्ष्मण शियार असे आरोपीचे नाव आहे. लक्ष्मणही पर्यटक म्हणून गोव्यात आले होते. पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता आणि आरोपी एकमेकांना विमानात भेट झाली होती आणि त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचा फोन नंबर घेतला आणि मग दोघं फोनवरुन एकमेकांशी संपर्कात होते.

पोलिसांनी सांगितले की, 23 ऑगस्टला पीडित मुलगी आणि आरोपी स्वतंत्रपणे गोव्याला गेले. 23 ऑगस्ट रोजी त्याने महिलेला फोन केला आणि तो राहत असलेल्या असोनोरा येथील रिसॉर्टमध्ये बोलावले. जेव्हा ती महिला रिसॉर्टमध्ये पोहोचली तेव्हा लक्ष्मणने तिला आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेवर बलात्कार केल्यानंतर या घटनेबाबत कोणालाही न सांगण्याची तिला धमकीही दिली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलीस पथके तयार करण्यात आली आणि आरोपीला उत्तर गोव्यातील म्हापसा शहरातील थिविम गावातून अटक करण्यात आली. पोलिसांनी पीडितेच्या वयाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.