सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल त्यांच्या पुण्यतिथी दिवशी अपमानास्पद फेसबुक वर पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील सावरकर प्रेमींनी रोष व्यक्त केला होता. याप्रकरणी सामाजिक शांतता भंग करणाऱ्या नरेश हालगे या इसमाविरुद्ध आज (दि.28) रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.26 शुक्रवार रोजी एका निवेदनाद्वारे अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर व पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. शिवसेना नेते संजय कुकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन भादवि कलम 153 अ, 505(2) प्रमाणे आरोपी नरेश हालगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश हालगे ही व्यक्ती वारंवार फेसबुक व समाज माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य हिंदुत्ववादी महापुरुषांच्या संदर्भात जाणीवपूर्वक अपमानास्पद व भावना दुखावण्याच्या उद्देशाने मजकूर, छायाचित्रे प्रसारित करते. या इसमाविरुद्ध सामाजिक शांतता भंग करणे, महापुरुषांची बदनामी करणे,भावना दुखावणे आदींसाठी कारणीभूत धरुन गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी परळीतील सावरकर प्रेमींनी पोलीसांकडे केली होती. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि प्रदीप एकसिंगे हे करीत आहेत.