चोर बाजारात घेतलेल्या त्या चमच्यामुळे मालामाल झाला..! कसा? वाचा बातमी

एखाद्याचं नशीब चमकतं तेव्हा त्याची दुनियाच बदलते असं म्हणतात. हीच गोष्ट एका माणसाच्या बाबतीत खरी ठरली आहे. चोर बाजारात खरेदी केलेल्या एका चमच्यामुळे तो मालामाल झाला आहे.

लंडन येथील एका माणसाचं नशीब तेव्हा पलटलं जेव्हा त्याने अगदी कवडीमोल किमतीत आणलेला चमचा लाखमोलाचा निघाला. या माणसाने तेथील स्थानिक बाजारातून हा चमचा खरेदी केला होता. अगदी रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारात जुन्या पुराण्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात.

तिथून त्याने तो चमचा अवघ्या 90 पैशांना खरेदी केला. त्याला या चमच्यात काहीतरी वेगळं असावं असं वाटलं. त्यामुळे त्याने तो खरेदी केला. जवळपास पाच इंच लांबीचा तो चमचा खासच होता. त्याने नीट निरखून पाहिल्यानंतर तो चमचा साधा नसून चांदीचा असल्याचं त्याला आढळलं.

इतकंच नव्हे तर तो 13व्या शतकातील रोमन युरोपियन पद्धतीने घडवलेला चमचा असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने त्याची किंमत काढली तर ती तब्बल 52 हजार रुपये इतकी असल्याचं त्याला कळलं. त्याने ऑनलाईन विक्रीच्या वेबसाईटवर या चमच्याची बोली लावली. बघता बघता याची किंमत वाढली आणि हा चमचा तब्बल 1 लाख 97 हजार इतक्या किमतीला विकला गेला.

आपली प्रतिक्रिया द्या