धक्कादायक! हुंड्यासाठी बायकोचे गुप्तांग जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीने लग्नात हुंडा आणला नाही म्हणून एका नराधम पतीने त्याच्या आईच्या मदतीने पत्नीचे गुप्तांग जाळल्याची धक्कादायक घटना बंगळुरू मधील रामामुर्ती नगरमध्ये घडली आहे. सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तिचा पती व सासू फरार आहेत.

सुरज सिंग असे त्या नराधमाचे नाव असून त्याचे वर्षभरापूर्वी एका 22 वर्षीय तरुणीसोबत लग्न झाले होते. सुरजचे पान शॉप आहे. लग्नाच्या वेळी तरुणीच्या माहेरच्यांनी सुरजच्या घरासाठी संपूर्ण संसार दिला होता. तसेच काही रोकडही दिली होती. मात्र त्यानंतरही सुरज सतत त्याच्या पत्नीकड़े अधिक पैशाची मागणी करत होता. त्यामुळे वैतागून पीडितेने सुरजला घटस्फोट दे व माझ्या आई वडिलांनी दिलेले सर्व सामान परत दे असे सांगितले. ते ऐकून सुरज चिडला व त्याने आईच्या मदतीने पत्नीचे गुप्तांग जाळले.

पीडितेचा आरडा ओरडा ऐकून शेजारी धावत त्यांच्या घरी आले मात्र तोपर्यंत सुरज त्याच्या आईला घेऊन फरार झाला होता. त्यानंतर शेजारच्यांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी सुरज विरोधात गुन्हा दाखल केला आहे.