शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी माणसाने कापलं स्वतःचं मुंडकं

प्रातिनिधिक फोटो

शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी लंकाधीश रावण आपलं शीर बळी द्यायचा, अशी आख्यायिका आहे. अशाच प्रमाणे एका माणसाने आपलं शीर कापलं आहे.

काय आहे प्रकरण

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे हा प्रकार घडला आहे. रावणाच्या आख्यायिकेपासून प्रेरित होऊन या माणसाने आपलं शीर कापलं आहे. या माणसाचं नाव रुक्मणि विश्वकर्मा असं आहे. बेतवा नदी किनाऱ्यावर कोटेश्वर या प्राचीन शिवमंदिरात रुक्मणि वरचेवर जात असे.

शनिवारीही काही पूजेनिमित्त तो शिवमंदिरात गेला होता. त्यावेळी तिथे अनेक लोक उपस्थित होते. शिवमंदिराच्या गाभाऱ्यात एकटा बसलेला रुक्मणि पूजाअर्चा करत होता. अचानक सभामंडपात बसलेल्या इतर ग्रामस्थांना त्याच्या ओरडण्याचा आवाज आला.

आवाजाच्या दिशेन त्यांनी धाव घेतली तेव्हा रुक्मणिच्या गळ्यावरून कापल्याच्या खुणा दिसत होत्या आणि रक्त ओघळत होतं. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या