मनसोक्त मद्यपान केले…त्यानंतर वियाग्राच्या दोन गोळ्या घेतल्या…अन् यमसदनी पोहोचला… वाचा काय आहे घटना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मद्पानाचे दुष्परिणाम आपण वाचतोच शिवाय अशा काही घटनाही आपल्या आजूबाजूला घडत असतात.  दिल्लीतील एका व्यक्तिने दारूच्या नशेत असताना दोन वियाग्राच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याला पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर जे घडले ते अतिशय धक्कादायक होते.

एका मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, एका व्यसनाधिन व्यक्तिने मनसोक्त मद्यपान केल्यानंतर 2 वियाग्राच्या गोळ्या घेतल्या. तो दारूच्या नशेत असताना आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये थांबला होता. वियाग्राच्या गोळ्या घेतल्यानंतर त्याला पक्षाघाताचा झटका आला. याबाबत एम्स रुग्णालयाचे शवविच्छेदन करणारे डॉ. जय नारायण पंडित म्हणाले की, अति जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानंतर या व्यक्तिने 50 mg. च्या Viagra च्या दोन गोळ्या खाल्ल्या. त्या व्यक्तिला डॉक्टरांनी स्लिडानाफिला (Viagra) औषध घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला नव्हता, असे असूनही त्या व्यक्तिने वियाग्राच्या गोळ्या घेतल्या. त्यावेळी त्याचा रक्तदाब वाढला. तो आधीच दारूच्या नशेत होता. रक्तातील अल्कोहोलची पातळीदेखील शरीरात निर्धारित मानकांपेक्षा दुप्पट वाढली होती. गोळ्या घेतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले. वियाग्राची गोळी घेतल्यानंतर त्याला डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला, मात्र त्याच्या मैत्रिणीने आणि त्याने तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. काही वेळानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला. या व्यक्तीने कोणत्या ब्रँडचे औषध सेवन केले याविषयी वैद्यकीय जर्नलमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.

या प्रकरणाशी संबंधित पॅथॉलॉजिस्टने सांगितले की, एखाद्या व्यक्तीला पक्षाघाताचा झटका येण्याचे प्रमुख कारण म्हणजे दारू प्यायल्यानंतर वियाग्राचे सेवन करणे, दारू प्यायल्यामुळे त्या व्यक्तिचा रक्तदाब वाढलेला असायचा. जेव्हा त्याने वियाग्राची गोळी घेतली तेव्हा त्याच्या मेंदूच्या नसांवर दबाव आल्यामुळे त्याला पक्षाघाताचा झटका आला तसेच मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो. मृत्यूनंतर या व्यक्तिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये त्याच्या शरीरातील रक्तातील अल्कोहोलची पातळी 186.61 mg/100 ml असल्याचे समोर आले. जी पातळी 80 mg/100 ml असायला हवी, अशी माहिती अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका…

या प्रकरणाबाबत त्याच्या मैत्रिणीने असा दावा केला आहे की, त्या व्यक्तिला यापूर्वीही अशी लक्षणे दिसली होती, मात्र या प्रकरणाशी संबंधित डॉक्टरांनी दिलेली माहिती अशी की, लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. बऱ्याचदा पुरुष लैंगिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे औषध घेतात.