Konkan Crime News – कोंकण रेल्वेत चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधील जनरल डब्यातून प्रवास करताना प्रवाशांसोबत मैत्री करत एका चोरट्याने चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल चोरले. मात्र कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुळे हा चोरटा तात्काळ जाळ्यात सापडला.

मोहम्मद उस्मान गनी असे चोरट्यांचे नाव असून तो मडगाव येथे तो कोकणकन्या एक्सप्रेस मध्ये बसला. त्याने शेजारी बसलेल्या दोन प्रवाशांसोबत मैत्री केली. त्यांचा विश्वास संपादन करून त्याने दोन चॉकलेट खायला दिली.त्या चॉकलेट मध्ये इटीव्हॅन गोळी मिसळलेली होती. ते दोघेही प्रवासी रत्नागिरी स्थानकात गाडी आली तेव्हा बेशुध्द पडले होते. त्यांच्याकडील दोन मोबाईल आणि पर्समधील रोकड मोहम्मद गनी याने चोरली. गाडी संगमेश्वर स्थानकात येताच तो गाडीतून बाहेर आला स्लीपर कोच मध्ये शिरला. एस – 6 डब्यात गुप्तचर शाखेच्या पथकाने त्याला अडवल गुप्तचर शाखा रत्नागिरीचे निरीक्षक संजय वत्स, पीआर अमोल पाटील आणि पीआर कोकरे यांनी मोहम्मद गनीची चौकशी केली असता त्याच्याकडे तीन मोबाईल आढळले. त्याची चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे पथकाला संशय आल्याने पथक त्याला घेऊन चिपळूण स्थानकात उतरले.

तिथे आरपीएफने त्याची कसून चौकशी केली आणि त्याने कबुली देताना आपण बिहारचे रहिवासी असून मुंबईतील अंधेरी येथील एका बांधकाम साइटवर कामगार म्हणून काम करतो. आणि दादरमध्ये भेटलेल्या राजू नावाच्या व्यक्तीने त्याला काही चॉकलेट देऊन मडगावला पाठवले असे त्याने सांगितले. चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर बेशुध्द झालेल्या दोन प्रवाशांना पनवेल येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.