घोडा घेऊन ट्रेनमध्ये घुसला,कंडक्टरने तरुणाला खाली उतरवला

सामना ऑनलाईन, व्हिएन्ना

ऑस्ट्रियातील स्टायरिया प्रांतात एका रेल्वेमध्ये प्रवासी घोड्याला घेऊन चढला. घोडा ट्रेनमध्ये दिसल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं. या वेगळ्या पाहुण्याला बघून काहींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. ही घटना काहींनी मोबाईलमध्ये चित्रीत केली आणि ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली.
<

हा वेगळा पाहुणा एकदम मस्त होता, शांत आणि उमदा दिसत होता मात्र तरीही त्याला आणि त्याच्या मालकाला ट्रेनच्या कंडक्टरने खाली उतरवला. ट्रेनमध्ये काहीही अप्रिय घटना घडली तर त्याचा त्रास घोडा आणि प्रवासी दोघांनाही झाला असता. ट्रेनला अचानक ब्रेक लावला असता तर घोडा प्रवाशांच्या अंगावर पडला असता, त्यात जिवीतहानी होण्याचीही शक्यता होती. त्यामुळेच घोड्याला आणि त्याच्या मालकाला दोघांना ट्रेनमधून उतरवण्यात आले.