उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून एकाला दिले पेटवून, खूनप्रकरणी तरूणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हातउसने घेतलेले 10 लाख रूपये वेळेत परत न दिल्याच्या रागातून तरूणाने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना 30 सप्टेंबरला सकाळी दहाच्या सुमारास फुरसुंगीतील संकेत विहारजवळ घडली.

उपचारादरम्यान संबंधित तरूणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मनोज मोहन कांदे (वय 28, रा. फुरसुंगी) याला अटक केली आहे. संतोष कागदे (वय 51 रा. आंबेगाव बुद्रूक) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक राजू अडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षारक्षक संतोष आणि आरोपी मनोज मित्र आहेत. संतोष एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक होता. काही महिन्यांपूर्वी संतोषने मनोजकडून 10 लाख रूपये उसने घेतले होते. त्यानंतर पैसे माघारी देण्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली.

त्याच रागातून गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास मनोजने संतोषच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या संतोषचा उपचारादरम्यान ससून रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरू आहे.