मटण एकट्यानेच खाल्ले म्हणून मित्रांनी केली त्याची हत्या

985
प्रातिनिधिक फोटो

मटण खाण्याच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना रविवारी अंधेरीच्या मरोळ नाका परिसरात घडली. हत्येप्रकरणी मुत्तूकुमार स्टिफन नाडर आणि अनिल कांबळेला सहार पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीच्या मरोळ नाका येथील फुटपाथवर सुनील नेपाळी, मुत्तूकुमार आणि अनिल कांबळे हे राहायचे. नाडर आणि कांबळेने मटण आणून ते बनवण्यास सुनीलला सांगितले. त्यानंतर ते दोघे दारू पिण्यास गेले. सुनीलने मटण बनवून एकटय़ानेच खाल्ल्यामुळे झालेल्या वादातून त्या दोघांनी त्याची हत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या