संपत्ती विकण्याच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या

1015
murder

माढा तालुक्यातील उमाटे या गावातील मुलानेच गाळे विकण्याच्या कारणावरून स्वतःच्या पित्यास जीवे मारल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मयताची पत्नी अंजना रमेश माळी (वय 45) हिने स्वतःचा मुलगा गणेश रमेश माळी( वय 23)याच्या विरोधात माढा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे

गाळे विकण्याच्या कारणावरून जन्मदात्या पित्याचा तोंड व गळा दाबून मुलाने खून केल्याची घटना अंजनगाव उमाटे ता माढा येथे घडली असुन रमेश विठ्ठल माळी वय 50असे मयताचे नांव असुन याबाबत मयताची पत्नी अंजना रमेश माळी हिने मुलगा गणेश रमेश माळी याचे विरोधात माढा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की अंजनगाव उमाटे ग्रामपंचायत हद्दीत रमेश माळी यांच्या मालकीचे गावाच्या चौकातच गाळे होते सदरचे गाळे विक्री करण्याचा मानस मयत रमेश माळी यांचा होता आणि अशा विक्रीस मुलाचा विरोध होता. आज याच कारणावरून बापलेकात भांडणे झाली. वडिल हे गाळे विकण्याबाबत अडून होते  हा मी गाळे विकणारच असे म्हणाल्याच्या कारणावरून चिडुन आरोपी गणेश याने मयत रमेश याचे मानेवर बुक्की ने मारहाण करून तो खाली पडल्यानंतर त्यांचा गळा व तोंड दाबून त्यास जीवे ठार मारले अशी तक्रार मयताची पत्नी अंजना रमेश माळी हिने दिल्याने माढा पोलीस ठाण्यात गणेश माळी याच्या वर कलम 302, 323 प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे. एकाच आठवड्यातील मुलाने बापाला संपवण्याची ही दुसरी घटना असल्याने माढा तालुका हादरला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या