खाटकानं उच्चशिक्षित प्रेयसीचा बकरा कापायच्या सुऱ्याने गळा चिरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील वारंगल येथे एका खाटिकाने त्याच्या प्रेयसीची बकरा कापायच्या सुऱ्याने गळा चिरून हत्या केली आहे. या हल्ल्यात त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मुंगाला हराथी असे त्या तरुणीचे नाव असून तिचे मोहम्मद शाहिदसोबत अफेयर होते. ते दोघेही काझीपेट येथील विष्णूपुरी भागात राहायचे.

मुंगाला व शाहिद दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. पदवीपर्यंत एकत्र शिक्षण घेतल्यानंतर मुंगालाने मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली. तर शाहीद हा एका मटनाच्या दुकानावर खाटिकाचे काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून शाहिदला मुंगालाचे दुसऱ्या कुणासोबत तरी सूत जुळल्याचा संशय येत होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे.

शुक्रवारी संध्याकाळी शाहिदने मुंगालाला त्याच्या घरी बोलावले. ‘आपण एकत्र बसून शांतपणे आपल्यातील मतभेद मिटवू’ असे त्याने तिला सांगितले होते. मात्र मुंगाला त्याच्या घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या बकरा कापायच्या धारदार सुऱ्याने तिचा गळा चिरला. त्यानंतर त्याने स्थानिक न्यायालयाच्या न्य़ायधीशाच्या घरी जाऊन त्यांच्यासमोर स्वत:चा गुन्हा कबूल केला.