बाईक व मोबाईलसाठी जन्मदात्यानेच तीन महिन्यांच्या चिमुरडीला विकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाईक व मोबाईल अशा चैनीच्या वस्तू घेण्यासाठी एका दाम्पत्याने चक्क त्यांच्या पोटच्या तीन महिन्यांच्या मुलीला विकल्याचे समोर आले आहे. कर्नाटकमधील चिक्काबल्लापूर जिल्ह्यातीन तिनाकाल गावात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलीसांनी आईला ताब्यात घेतले आहे. तर त्या मुलीचा बाप फरार आहे.

रिंकी आणि राजू असे त्या दाम्पत्याचे नाव असून राजू मजूरी करून घर चालवतो. राजूला बऱ्याच दिवसांपासून स्मार्टफोन घ्यायचा होता. मात्र त्याची कमाई त्याला अपूरी पडत होती. त्यामुळे त्याने त्याच्या मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. मूल नसलेले एक जोडपे त्यांच्या मुलीला विकत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र रिंकूने राजूला विरोध केला. पण त्याने मुलीला मारून टाकेन असे सांगितले. त्यामुळे राजूच्या हट्टापुढे रिंकू काहीच करू शकले नाही. अखेर राजूने त्याच्या मुलीला एक लाख रुपये रोकड घेऊन विकले. त्यानंतर त्याने 50 हजाराची एक बाईक विकत घेतली व 15 हजाराचा मोबाईलही घेतला. स्वत:ला नवीन कपडे घेतले. त्याच्याकडे अचानक आलेल्या पैशांमुळे त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला राजूवर संशय आला. तसेच दोन दिवस झाले बाळाच्या रडण्याचा आवाजही ऐकू न आल्याने त्या व्यक्तीने याबाबत एका पोलिसाला सांगितले. पोलिसांनी रिंकूची चौकशी केली असता तिने मुलीला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रिंकूला ताब्यात घेतले व सध्या पोलीस राजूचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी विकलेल्या मुलीला देखील ताब्यात घेत एका अनाथ आश्रमात ठेवले आहे. मुलीच्या आईने मुलीला तिच्याकडे देण्याची मागणी केली आहे.