
सोशल मीडियावर रोज नवीनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही काही व्हिडीओ इतके भयंकर असतात की त्यावर विश्वास ठेवणेच कठीण होते. असाच एक आफ्रिकेतील एका कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतेय. या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आलाय की, एका व्यक्तीच्या सहा बायका असून त्या एकाच वेळी प्रेग्नेंट आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
सदर व्हिडीओ हा kenyan_statue_man नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हि़डीओमध्ये एक आफ्रिकन व्यक्ती आणि त्याच्या सहा बायका दिसत आहे. आणि आश्चर्य म्हणजे या सहाही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओतील या आफ्रिकन माणसाची तुलना केनियाच्या प्रसिद्ध “बहुपत्नीक राजा” अकुकुडंगेरशी केली जात आहे. घरातील सर्व महिला एकाच वेळी गर्भवती राहिल्यानंतर, त्याचे घर प्रसूती वॉर्डसारखे दिसू लागले आहे, अशी टीका अनेकांनी केली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नक्कीच हा माणूस लखपती असणार, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसरा म्हणाला की, व्हिडीओमध्ये त्या बायका जराही खुश दिसत नाहीएत! ही बाब खूप चिंताजनक आहे, अशा अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.



























































