अबब ! स्वत:च्याच लग्नात नवरा चक्क स्टेजवर झोपला, पाहुणे मंडळींना घ्यावे लागले कष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात ‘लग्न’ हा अविस्मरणीय क्षण असतो. यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अनेक धार्मिक विधींमुळे नवरा-बायको काही वेळा दमून जातात. एका लग्नप्रसंगी नवऱ्याला विवाहावेळी होणाऱ्या रेलचेलीमुळे फारच थकवा आला. त्यामुळे मजेशीर किस्सा घडला. या प्रसंगाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

दिल्लीत राहणाऱे निरंजन महापात्रा यांचे लग्न होते. लग्नावेळी ते आणि त्यांची पत्नी स्टेजवर बसले होते, पण सगळ्यात गमतीशीर किस्सा हा की, त्यांच्या लग्नसोहळ्यात तेच स्टेजवर खुर्चीत बसून गाढ झोपले होते. आश्चर्य म्हणजे लग्नाला आलेल्या पै पाहुण्यांनी नवऱ्या मुलाला उठवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अक्षरश: हलवून हलवून, मोठमोठ्या आवाजात नवऱ्याच्या नावाने हाका मारून लोकं त्याला उठवत होते, पण नवऱ्याचा काही डोळा उघडेना. नवरीही अधून मधून झोपलेल्या नवऱ्याकडे काणाडोळा करून बघत होती, पण नवऱा मुलगा एवढा गाढ झोपला होता की, तो जराही जागचा हलला नाही की त्याचा डोळा एक क्षणभरही उघडला नाही.

स्वत:च्याच लग्नात तो खूप दारू प्यायला आहे, तर काहींनी सांगितले की, त्याला आज त्याच्या खोलीत जाऊच देणार नाही, अशा प्रकारच्या अनेक विनोदी प्रतिक्रिया हा गमतीशीर व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी दिल्या आहेत.