
उत्तर प्रदेशातील नेकपूर भागात सैतानालाही लाजवेल असे कृत्य एका व्यक्तीने केलं आहे. पन्नालाल असं या व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी त्याने त्याच्या गर्भवती बायकोचं चाकूने पोट चिरलं. माथेफिरू पन्नालालची त्याच्या पत्नीने मुलालाच जन्म द्यावा अशी इच्छा होती. बदायूंमधली ही घटना ऐकल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. पन्नालालच्या बायकोला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रकृती खालवल्याने तिला दिल्लीतील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मंगळवारी या महिलेने मृत अर्भकाला जन्म दिला. महिलेची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
पन्नालाल याला 5 मुली आहे. आपल्याला मुलगा व्हावा असी त्याची इच्छा होती. त्याची पत्नी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर आपल्याला आता मुलगाच हवा या विचाराने पन्नालाल पिसाटला होता. शनिवारी त्याने पत्नीच्या पोटात मुलगा आहे का मुलगी हे जाणून घेण्यासाठी चाकूने तिचे पोट फाडले. या महिलेचा आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजारपाजारची माणसे पन्नालालच्या घराकडे धावत आली. त्यांनी या महिलेने रुग्णालयात दाखल केलं होतं. मंगळवारी या महिलेने मुलाला जन्म दिला खरा मात्र तो मृतावस्थेत जन्माला आला. पन्नालाल हा एक किराणामाल विक्रीचे दुकान चालवतो. पन्नालालला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे.

























































