
कादिवली येथील पुलासाठी नव्यानेच तयार करण्यात आलेल्या जोडरस्त्याचा भराव खचला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतुक धोक्याची झाली आहे. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला धोका असल्याबाबतचे दिशा दर्शक फलक लावलेले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकुणच कार्यत्परतेवर शंका व्यक्त होत आहे.
दापोली तालूक्यातील एक महत्वाचा मार्ग असलेल्या दापोली कुडावळे कादीवली वेळवी आंजर्ले या मार्गावरील कादिवली येथे एका नदीवरील पुलासाठी नव्यानेच बांधलेल्या पुलाचा जोडरस्ता जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला खचलेल्या रस्त्याचे ठिकाण हे अडथळा ठरत आहे. ही परिस्थिती वाहन चालकांना समजण्यासाठी रस्ता खचल्याच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याच्या आधी पुढे धोका आहे वाहने कमी वेगाने चालवा अथवा सावकाश हाका अशाप्रकारचे दिशा दर्शक फलक हे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावणे हे लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचे काहीही पडलेले दिसत नाही आणि म्हणूनच रस्ता खचून दोन दिवस झाले तरी सार्वजनिक बांधकामला धोका असल्याबाबतचे दिशादर्शक फलक लावता आलेले नाहीत.
कादिवली या गावातूनच आंजर्ले तसेच मांदिवली गावाकडे जाणारी वाहतुक होते तसेच आंजर्ले येथून पूणे मुंबईकडे जाणारा हा मार्ग आहे. त्याचप्रमाणे मंडणगडहून पालवणी मार्गे वेळवीकडे येणारा हा महत्वाचा असा मार्ग आहे. अशा या मार्गावर दिवसभरात किमान 10 एस.टी. बसेस धावत असतात तसे खाजगी वाहनांचीही या मार्गावर कायमच वर्दळ असते. असा हा रहदारी आणि दळणवळाच्यादृष्टीने महत्वाचा असा मार्ग आहे.
या परिसरातील गावांसाठी कादिवली या ठिकाणी विदर्भ कोकण सहकारी बॅक आहे. या ठिकाणी आपआपले देव घेवीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी या परिसरातील नागरिकांना नेहमी यावे लागते.तर वेळवी येथे हायस्कुल आहे. येथे शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी या परिसातील गावातील विद्यार्थ्यांना दररोज याच मार्गाने जावे लागते. त्याचप्रमाणे दापोलीत जाण्यासाठी मंडणगडात जाण्यासाठी या परिसरातील लोक याच एकमेव रस्त्याचा वापर करतात त्यामुळे हा रस्ता किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येते. आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत फार काळजी घेतली नसली तरी लोकांच्या सुरक्षितेसाठी किमान आता धोका असल्याबाबत दिषा दर्शक फलक तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात यावेत अशा प्रकारची मागणी या मार्गावरून गेेले दोन दिवस प्रवास करणा-या प्रवाशांनी रस्त्याची एकुणच परिस्थिती पाहता मागणी केली आहे.























































