
सात हजार रुपयांची लाच घेऊन फरार झालेला तलाठी सूरज नळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अखेर मंगळवेढय़ाजवळच अटक केली आहे.
सोलापूर-सांगली महामार्गासाठी बाधित झालेल्या पाइपलाइनच्या भरपाईपोटी एक लाख 43 हजार रुपयांचे धनादेश काढून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेऊन मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी संजय नळे हा फरार झाला होता. या प्रकरणात खासगी व्यक्ती पंकज चव्हाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, तो पोलीस कोठडीत आहे. गेल्या तीन दिवसांपासून नळे हा फरार होता. त्याचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी आज त्याला मंगळवेढय़ाजवळच अटक केली आहे.
तलाठी नळे याच्याकडून या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का? हे तपासात समोर येणार आहे. दरम्यान, आज नळे याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.





























































