गच्चीवर फुलवली आमराई,  एर्नाकुलमच्या मँगो मॅनची कमाल

679

घराच्या  टेरेसवर फुलभाज्यांची लागवड केल्याचं आपण ऐकतो, मात्र आंब्याची झाडं, तीदेखील 40 वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या झाडं लावण्याची कल्पनाही करू शकत नाही. एर्नाकुलम येथील एका अवलियाने गच्चीवर चक्क आमराई फुलवली आहे. मोठय़ा पिंपामध्ये त्याने आंब्याची झाडं लावली आहेत आणि त्यांना भरघोस आंबे लगडले आहेत. जोसेफ प्रान्सिस असे या ‘मँगो मॅन’ चे नाव आहे. 63 वर्षांचे जोसेफ व्यवसायाने एअर कंडिशनर टेक्निशियन आहेत. त्यांचे वाडवडील शेती करायचे. जोसेफ यांची आजी  भरपूर गुलाबांची रोपं लावायची. आजीमुळेच त्यांना फळभाज्यांच्या लागवडीची प्रेरणा मिळाली. जोसेफ यांनी सुरुवातीला गच्चीवर गुलाब आणि मशरूम लावले. त्यानंतर त्यांनी आंब्याकडे मोर्चा कळवला. त्यांनी काही पीव्हीसी ड्रम खरेदी केले. ड्रम कापून त्यात आंब्याची रोपं लावली. हापूस, केसर, नीलम, मालगोवा, चंद्रकरण अशी विविध प्रकारची आंब्याची झाडं त्यांनी लावली. आज ही झाडं चांगली 9 फुटापर्यंत वाढली आहेत.

जोसेफ यांनी कलम लावून नव्या प्रकारच्या आंब्याची लागवडही केली आहे. त्या आंब्याला त्यांनी पत्नीचे नाव ‘पेट्रीशिया’ दिलंय. पेट्रीशिया हा सर्वात गोड आंबा असल्याचा दावा जोसेफ करतात.

आपली प्रतिक्रिया द्या