माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्कार

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नाटय़गीत तसेच भावगीत, भक्तिगीत असे सर्व गीत प्रकार गाणाऱ्या चतुरस्र गायिका माणिक वर्मा यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 16 मेपासून सुरू होत आहे. यानिमित्त माणिक वर्मा फाऊंडेशनने वर्षभर विविध कार्यक्रमाचे, उपक्रमांचे आयोजन केले आहे. गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येईल. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाने होणार आहे. 12 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्प येथे सायंकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम होईल. लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी विकास कशाळकर, चैतन्य पुंटे, शैला दातार, सचिन पिळगावकर उपस्थित राहतील. यावेळी ‘हसले मनी चांदणे’ हा माणिक गीतांचा कार्यक्रम संगीतकार काwशल इनामदार आणि सहकारी सादर करतील. माणिक वर्मा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य सांस्पृतिक विभाग यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम होईल.