हिंदुस्थानची आघाडी टेबल टेनिसपटू मनिका बत्राचे पेरू येथील एका स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर मायदेशी परतताना क्रीडा साहित्याची बॅग हरवली. आपली बॅग परत मिळविण्यासाठी तिने हिंदुस्थानी सरकारकडे मदत मागितली आहे. ती बिझनेस क्लासने प्रवास करत होती. पण नवी दिल्लीला पोहोचल्यानंतर तिच्या क्रीडा साहित्याची बॅगच सापडली नाही. त्यामुळे तिने तत्काळ नागरिक उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मदत मागितली आहे. क्रीडा साहित्याची बॅग न मिळाल्याने आपण विमानळावरील स्टाफकडे बॅगेची विचारणा केली, पण कुणीही त्याबाबत मदत किंवा माहिती देऊ शकला नसल्याचे मनिकाने सांगितले.





























































