manikrao kokate – माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल

सरकारी कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असताना माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. त्यांनी शरण येण्यासाठी न्यायालयाकडे 4 दिवसांचा वेळ मागितला आहे.