
सामना ऑनलाईन, मुंबई
परदेशी मैत्रिणीसोबत वाशी ते गोवंडीदरम्यान ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका 22 वर्षीय मणिपुरी विद्यार्थिनीची दोन नराधमांनी छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधमांचा कसून शोध सुरू केला आहे. मणिपूरची ही विद्यार्थिनी गेल्या सात दिवसांपूर्वी वाशी येथून मुंबईकडे जात होती. त्यावेळी दोन नराधमांनी तिची छेड काढण्यास सुरुवात केली. या विद्यार्थिनीने त्या नराधमांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र डब्यातील एकही प्रवासी या तरुणीच्या मदतीला धावून आला नाही. ही तरुणी व तिची विदेशी मैत्रीणही जनरल डब्यातून प्रवास करीत होते.




























































