
सामना ऑनलाईन, मुंबई
पूर्व उपनगरातील राष्ट्रवादीच्या वॉर्ड क्रमांक 119 मधील नगरसेकिका मनीषा रहाटे यांचे अनधिकृत बांधकाम प्रकरणात रद्द होणारे पद पालिका सभागृहामुळे तूर्तास वाचले आहे. या प्रकरणात कारवाई करण्याची प्रशासनाची मागणी पालिका सभागृहाने गुरुवारी नाकारल्याने रहाटे यांना दिलासा मिळाला आहे. सभागृहाने कारवाईची परवानगी दिल्यास न्यायालयीन कारवाईला रहाटे यांना सामोरे जावे लागले असते.
विक्रोळी-हरियाली व्हिलेज येथील यशवंत कॉलनीमधील त्या राहत असलेल्या घराचे बांधकाम करण्यात होते. त्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या बेकायदा बांधकामाकर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी सुनीता हांडे यांनी 2 मार्च 2017 रोजी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली होती. अशाच प्रकारची तक्रार हांडे यांनी 25 एप्रिल 2017 रोजी करून मनीषा रहाटे यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.



























































