काँग्रेस कार्यकर्त्याचे मारेकरी इगतपुरीमध्ये सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
manoj-dubey-congress

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपर येथील काँग्रेसचा कार्यकर्ता मनोज दुबे याची हत्या करून पसार झालेले भाजपाचे दोघे कार्यकर्ते अखेर आज सकाळी इगतपुरीमध्ये सापडले. ते इगतपुरीमधून देखील सटकण्याच्या प्रयत्नात होते, पण साकीनाका पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली.

रविवारी रात्री दीड वाजता असल्फा व्हिलेज येथील माहेश्वरी महादेव मंदिरासमोर काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे याची भाजपाचे कार्यकर्ते जितेंद्र मिश्रा आणि उमेश सिंह यांनी तलवारीने वार करून हत्या केली होती. मनोजला रस्त्यात आडवा केल्यानंतर दोघांनी दुचाकीवरून विद्याविहार रेल्वे स्थानक गाठले. तेथे दुचाकी पार्प केल्यानंतर टॅक्सीने ते सीएसटीला गेले. सीएसटी स्थानकातून यूपीला जाणारी एक्सप्रेस पकडून दोघे भुसावळला गेले. मग भुसावळमधून पुन्हा इगतपुरीला आले. मग इगतपुरी हायवेवर आले. तेथून ते दुसरीकडे पळण्याच्या तयारीत होते, पण त्याआधीच साकीनाका पोलिसांनी त्यांना पकडले. दोघांनीही त्यांचे मोबाईल बंद केले होते. नवीन सीम कार्ड घेऊन ते परिस्थितीचा आढावा घेत होते. पण इतके करूनही उमेश आणि जितेंद्रला पोलिसांनी पकडले. फेकबुकवर चॅटिंग आणि अधेमधे उडणारे खटके यातूनच मनोजची हत्या केल्याचे आरोपींचे म्हणणे असल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.