सरकारसोबत काही मुद्द्यांवर सहमती, मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रखरखत्या उन्हात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी शनिवारी राज्य सरकारकडून काही मुद्दय़ांवर सहमती झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर उशिरा उपोषण सोडले. तीव्र उष्णतेत त्यांनी शनिवारी उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या मुद्दय़ांवर सहमती

z 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना दिले जाणार. z नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणार. z हैदराबाद गॅझेटनुसार एसओपी तयार. z जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त दर 15 दिवसांत बैठक घेणार. z सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी एका महिन्याची मुदत. z न्या.शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ.