मनोज जरांगे-पाटील यांना सशस्त्र पोलीस सुरक्षा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांना राज्य शासनाने सशस्त्र पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन शस्त्रधारी पोलीस जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असणार आहेत.

जरांगे-पाटलांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानंतर मनोज जरांगे-पाटील यांना 24 तास सुरक्षा देण्यात आली आहे.