
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी उपसमिती गठित केली आहे. मात्र ही उपसमिती जाती जातीत वाद निर्माण करण्याचे काम करत आहे. मराठा समाजाचं भलं झालेलं छगन भुजबळांना देखवत नसेल तर त्यांनी बाडबिस्तरा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील गुंडाळून थेट हिमालयात जावं, असा जोरदार हल्लाबोल मराठा यांनी केला आहे.
आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी आज पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेटसह इतर बाबींवरून प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. उपसमितीतील दुसऱ्या सदस्य पंकजा मुंडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी टीकेची झोड उठवली.
ओबीसी आरक्षण उपसमितीच्या माध्यमातून गोरगरिबांचे कल्याण होईल, अशी भूमिका घेतली पाहिजे. मात्र ही उपसमिती जाती जातीत वाद निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्वांमागे छगन भुजबळच असून, त्यांना मराठा समाजाचे हित बघवत नसल्याचा टोला जरांगे यांनी लगावला. भुजबळांना मराठा समाजाचं भलं पाहवत नसेल तर त्यांनी बाडबिस्तर गुंडाळून हिमालयात निघून जावे, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.