
ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी मुंबईत ठाकरेच पाहिजेत, या विधानाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पुनरुच्चार केला. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईत ठाकरेच पाहिजे, असे मी पूर्वी म्हणालो होतो. तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे, मात्र आजही माझे तेच मत आहे. मी जे बोललो होतो त्यावर मी कायम आहे. मुंबईत ठाकरे पाहिजेत ही लोकभावना आहे. ती म्हणच लोकांनी बनवली आहे, असे जरांगे पुढे म्हणाले.



























































