महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्ट. जनरल मनोज नरवणे लष्करप्रमुख होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देशाचे नवे लष्करप्रमुख असणार आहेत. विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्याकडील लष्कराची सूत्रे लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्याकडे येणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश पदापाठोपाठ लष्करप्रमुख हे आणखी एक सर्वोच्च पद मराठी माणसाला लाभले आहे.

नरवणे हे सध्या उपलष्करप्रमुख आहेत. सेवाज्येष्ठतेच्या तत्त्वानुसार केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ समितीने त्यांची लष्करप्रमुख पदी निवड केली आहे. सर्वच पातळ्यांवर त्यांच्या निवडीला हिरवा कंदील मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी याच वर्षी सप्टेंबरमध्ये व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याआधी सैन्याच्या पूर्वेकडील भागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हिंदुस्थानच्या चीनशी संलग्न सुमारे 4 हजार कि.मी. लांब सीमेचे रक्षण त्यांनी केले.

नरवणे हे मूळचे पुण्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत झाले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून जून 1980मध्ये ते 7 सीख लाईट इन्फंट्रीमधून लष्करात दाखल झाले. त्यांनी राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व त्यांनी केले. तसेच आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे इन्स्पेक्टर जनरल, स्ट्राईक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील जनरल ऑफिसर इन कमांडिंग, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अशा अनेक महत्त्वाच्या पदांची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ समितीने त्यांची लष्करप्रमुख पदी निवड केली आहे. सर्वच पातळ्यांवर त्यांच्या निवडीला हिरवा कंदील मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी याच वर्षी सप्टेंबरमध्ये व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याआधी सैन्याच्या पूर्वेकडील भागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हिंदुस्थानच्या चीनशी संलग्न सुमारे 4 हजार कि.मी. लांब सीमेचे रक्षण त्यांनी केले.