
शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनोज गजानन पांचाळ यांची चिपळूण उपशहरप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नेते विनायक राऊत आणि आमदार भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी पांचाळ यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. मनोज पांचाळ यांच्या नियुक्तीमुळे चिपळूण शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पक्षविस्तार, जनसंपर्क आणि संघटनात्मक बळकटी यासाठी ते सक्रियपणे काम करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

































































