
‘बेस्ट’ उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकारीपदी मनोज वराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वराडे यांनी यापूर्वी ‘बेस्ट’च्या विविध विभागांमध्ये विविध पदांवर काम केले असून जनसंपर्क विभागामध्ये सहायक जनसंपर्क अधिकारी, उप जनसंपर्क अधिकारी म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली आहे. वराडे यांनी जनसंपर्क व्यवस्थापन विषयामध्ये पदव्युत्तर पदविका प्राप्त केली असून जनसंपर्क विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवीही संपादन केली आहे. ‘बेस्ट’ उपक्रमाचे अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटर हँडल सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.




























































