
मंत्रालयात सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर सिलिंगचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेले नाही. पण या घटनेमुळे मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुर्घटना घडली त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाहेर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असते. त्याच ठिकाणी सिलिंगचा भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी तिथे कुणीही नव्हते.