स्विमिंगपूलमध्ये मिस वर्ल्ड मानुषीचे फोटोशूट, पाहा ही जलपरी

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही कायम तिच्या चाहत्यांना तिच्या नाजुक अदांनी घायाळ करत असते. जगातील सर्वात सुंदर महिला असलेल्या मानुषीने नुकतेच स्विमिंगपूलमध्ये फोटोशूट केले असून त्यात ती अगदी जलपरी दिसत आहेत.

2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावलेली मानुषी ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मानुषी अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

त्यात ती कन्नौजची राजकुमारी संयुक्ताच्या भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटींग लॉकडाऊनमुळे काही काळ बंद होते.

मात्र गेल्या महिन्यातच मानुषीने पुन्हा एकदा शूटींगला सुरुवात केली. अक्षय कुमारने गेल्या महिन्यात पृथ्वीराजच्या सेटवरील त्या दोघांचे फोटो शेअर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या