
सप्टेंबर महिन्यापासून, पैशांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. यामध्ये आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख, आधार कार्ड अपडेट, यूपीएसमध्ये बदल करण्याची शेवटची तारीख आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियमांचा समावेश आहे.
एलपीजीच्या किमती
एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलतात. या वेळीही 1 सप्टेंबर रोजी किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात. हे बदल तेल कंपन्या आणि जागतिक बाजारपेठेनुसार ठरवले जातात.
आधार कार्ड अपडेट
यूआयडीएआयने आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 निश्चित केली आहे. यानंतर, तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. जर तुमच्या आधारमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर तो वेळेत अपडेट करा.
‘एनपीएस’वरून ‘यूपीएस’वर स्विच करण्याची शेवटची संधी
सरकारने कर्मचाऱ्यांना एनपीएसवरून (नवीन पेन्शन योजना) यूपीएसमध्ये (जुनी पेन्शन योजना) स्विच करण्याचा पर्याय दिला आहे. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे.
चांदीवरील नवीन नियम
1 सप्टेंबरपासून चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू होईल. आता ग्राहकांना दोन पर्याय असतील ते हॉलमार्क केलेले चांदी किंवा हॉलमार्क नसलेले चांदी खरेदी करू शकतात. बीआयएसने चांदीच्या दागिन्यांसाठी देखील हॉलमार्किंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सध्या हा नियम अनिवार्य नसेल, तर तो ऐच्छिक असेल.
एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये बदल
सोमवारपासून एसबीआय क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्स प्रोग्राममध्ये बदल करण्यात आला आहे. आता ग्राहकांना प्रत्येक प्रकारच्या खरेदीवर पॉइंट्स मिळणार नाहीत. या बदलाचा लाखो एसबीआय कार्डधारकांवर परिणाम होईल.
इंडिया पोस्टचे नवीन नियम
इंडिया पोस्टने एक मोठा बदल केला आहे. पोस्ट खात्याची रजिस्टर्ड सेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार असून ती आता स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार आहे. म्हणजे रजिस्टर्ड पोस्ट असेल आता स्पीड पोस्टद्वारेच वितरित केले जातील.
आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख
ज्यांनी अद्याप आयकर रिटर्न (आयटीआर) भरलेला नाही, त्यांच्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 निश्चित केली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही तर तुम्हाला विलंब शुल्क आणि व्याज भरावे लागेल.
एफडी नियमांमध्ये बदल
सध्या अनेक बँका विशेष मुदत ठेव (एफडी) योजना चालवत आहेत, ज्यांची शेवटची तारीख सप्टेंबर 2025 आहे. म्हणजेच, जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि चांगला व्याजदर मिळवायचा असेल, तर 30 सप्टेंबरपूर्वी इंडियन बँक आणि आयडीबीआय बँकेच्या या विशेष एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.